Viral News: अबब! बॉयफ्रेंडला प्रेम करण्याचे देते लाखो रुपये! सौंदर्यवतीची ती ऑफर चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral News

Viral News: अबब! बॉयफ्रेंडला प्रेम करण्याचे देते लाखो रुपये! सौंदर्यवतीची ती ऑफर चर्चेत

Young Girl Viral Offer: सोशल मीडियावर एका तरुणीची सध्या भन्नाट चर्चा सुरू आहे. पैशांनी सर्व काही विकत घेता येतं पण प्रेम विकत घेता येत नाही असं साधारणत: म्हटलं जातं. मात्र एका तरुणीबाबत ही बाब जरा चुकीची ठरू शकते. सध्या चर्चेत असलेली ही तरुणी जो कोणी तिच्या बॉयफ्रेंडला प्रेम करण्याचा पगार देते. ही तरुणी आहे तरी कोण? आणि नेमका हा काय विषय आहे आणि या तरुणीची ही आगळीवेगळी ऑफर काय आहे ते वाचा.

या 26 वर्षीय सुंदर तरुणीचं नाव आहे Jane Park. ती एक प्रसिद्ध मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर आहे. मॉडेलिंगवर लाखो कमावणारी ही तरुणी तिच्या कमाईचे पैसे ती बॉयफ्रेंडवर खर्च करते.

काही वर्षांपूर्वी Jane Park नं आपल्या वेबसाईटवर 'मला बॉयफ्रेंड हवाय' अशी जाहिरात केली होती. अन् ज्या व्यक्तीची ती निवड करेल त्याला दर महिना पगार दिला जाईल असंही वचन तिनं दिलं होतं. मग काय जगभरातील तरुणांनी या अजब नोकरीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी एक तरुण तिने सिलेक्ट केलाय. सध्या ती त्याच्यासोबत लिव इन रिलेशनशिपमध्ये राहातेय.

हेही वाचा: Viral Love Story: तरुणाने केला आज्जीबाईंशी साखरपुडा, दहा वर्षांचा असतानाच झालेलं वेडं प्रेम

विशेष म्हणजे तिने सिलेक्ट केलेल्या बॉयफ्रेंडशी तिने करार केलाय. या करारानुसार तरुणाला दर महिन्याला ५७ लाख रुपयांचं मानधन मिळतं. अन् त्या बदल्यात तो तिच्यावर भरभरून प्रेम करतो. (Viral News)

हेही वाचा: Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

एका वृत्तानुसार जेनने 2013 साली तब्बल ९ कोटी ४५ लाख रुपयांची लॉटरी जिंकली होती. त्यावेळी ती केवळ १७ वर्षांची होती. तिनं एका अनुभवी अर्थतज्ज्ञाच्या मदतीनं आपल्या पैशांचं योग्य नियोजन आखलं. आणि आता ती एका ऐशोआरामाचं आयुष्य जगतेय. एवढंच नव्हे तर मॉडलिंग करून देखील ती लाखो रुपयांची कमाई करते. सध्या ती सर्वात कमी वेळात करोडपती झालेल्या लोकांपैकी एक म्हणून चर्चेत आहे.