Video Viral : खतम! रस्त्यावर क्रिकेट खेळताना बॅट्समनला गाडीने दिली धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Video Viral : खतम! रस्त्यावर क्रिकेट खेळताना बॅट्समनला गाडीने दिली धडक

रस्त्यावर स्टंप्स लावले, डांबरी रस्त्यालाच पीच बनवलं. रस्त्याच्या कडेने फिल्डर उभे आणि समोरून धावत येणारा बॉलर अशा प्रकारच्या गल्ली क्रिकेटचा आनंद आपणही घेतला असेल. गावात ग्राऊंड नसल्यावर अशा प्रकारे गल्ली क्रिकेट खेळलं जातं. एका गावातील क्रिकेटचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका मुलाला दुचाकीची धडक बसताना दिसत आहे. रस्त्यावर क्रिकेट खेळत असताना हा अपघाता झाला असून यामध्ये मुलगा चांगलाच जखमी झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, अनेक गावांमध्ये अशा प्रकारे क्रिकेट खेळला जातो. ग्राऊंड नसल्यामुळे रोडवर किंवा गल्लीमध्ये क्रिकेट खेळण्यास प्राधान्य दिलं जातं. तर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.