
shivaji maharaj
esakal
छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल साम्राज्य यांच्यातील संघर्षात ५ एप्रिल १६६३ हा दिवस विशेष ठरला. पुण्यातील लाल महालावर झालेल्या हल्ल्यात महाराजांनी शाहिस्तेखानाला धडा शिकवला. शाहिस्तेखान तेव्हा तब्बल तीन वर्षे पुण्यात ठाण मांडून बसला होता. तो जनतेला छळत होता, पिळवणूक करत होता. या अन्यायाविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णायक पाऊल उचलले.