Sharvari’s Emotional Letter to Her Father Goes Viral
esakal
पाचवीत शिक्षण घेणाऱ्या शर्वरी लाहुडकर हिचे वडिलांना लिहिलेले इंग्रजी पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शाळेच्या पिकनिकला जाण्यासाठी परवानगी मिळावी, या साध्या कारणासाठी लिहिलेल्या पत्राने मात्र हजारो वाचकांचे लक्ष वेधून घेतले आहे. शर्वरीने आपल्या निरागस भाषेत, स्पष्ट विचारांतून आणि भावनिक शब्दांतून वडिलांशी थेट संवाद साधला आहे.