

Lollapalooza India 2025: अमेरिकेचा वार्षिक संगीत महोत्सव म्हणून ओळखला जाणारा आणि बऱ्याच काळासाठी फक्त अमेरिकेपुरता मर्यादित असणारा ‘लोलापलूजा हा कार्यक्रम काही वर्षांनंतर वेगवेगळ्या देशांमध्ये देखील सुरू झाला. यावर्षी भारतात हा संगीत महोत्सव ८ आणि ९ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. तसेच या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण कॅनेडियन गायक-गीतकार शॉन मेंडिस आणि माजी वन डायरेक्शन सदस्य लुईस टॉमलिन्सन असणार होते.