

Pawankhind Battle
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंगांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील लोकांना प्रेरणा दिली आहे. अफजलखान वध, शाहिस्तेखानावर हल्ला, आग्र्यातून सुटका असे रोमांचक प्रसंग त्यांच्या धैर्याचे आणि बुद्धिचातुर्याचे द्योतक आहेत. यापैकीच एक अतिशय महत्त्वाची घटना म्हणजे पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि पावनखिंडीतील थरारक लढाई. या लढाईने शिवाजी महाराजांच्या युक्तीप्रयुक्तीची आणि त्यांच्या मावळ्यांच्या असीम शौर्याची ओळख शत्रूलाही करून दिली.