Shocking: महिलेने घरात पाळलेत चक्क एक लाख झुरळ, घराची भयानक अवस्था बघून अधिकारीही अवाक

महिलेच्या घराची अवस्था एवढी भयानक होती की अधिकाऱ्यांना आत शिरता येत नव्हते
Shocking News
Shocking Newsesakal

Scary News: अनेकांना घरात प्राणी पाळण्याची आवड असते. कोणी कुत्रे पाळतात तर कोणी मांजरं पाळतात. मात्र एका महिलेने तर कमालच केली. या महिलेने घरात तब्बल एक लाख झुरळ पाळले होते. ज्या झुरळांना आपण घरातून हाकलून लावतो. असे शंभर नाही तर चक्क एक लाख झुरळ या महिलेने घरात पाळले होते. याशिवाय या महिलेने ३०० पेक्षा अधिक जनावरांना घरात कोंडून ठेवले होते. याची माहिती जेव्हा अधिकाऱ्यांना मिळाली तेव्हा अधिकाऱ्यांची चक्क झोप उडाली.

महिलेच्या घरात आढळले ३०० पेक्षा जास्त प्राणी

अमेरिकेतील या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. असे सांगण्यात येतेय की, ५१ वर्षाची ही महिला सामाजिक कार्यकर्ता आहे. महिलेच्या घरातील एका रूग्णाने चुकून फायर अलार्म वाजवला त्यानंतर फायब ब्रिगेडची गाडी महिलेच्या घरी पोहोचली. त्यावेळी ती घरी काही रूग्णांना भेटत होती. दरम्यान अधिकाऱ्यांची घरात एन्ट्री होताच अधिकारी अवाक झालेत. महिलेच्या घरात चक्क १ लाख झुरळ,(cockroach) १५० पक्षी, सात कासव, ११८ ससे आणि १५ मांजरी पाळलेल्या होत्या.

फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या महिलेच्या घरातील हवा एवढी विषारी होती की कुणालाही आत जाणे कठीण झाले होते. त्यामुळे बचाव दलास हेज मॅट सूट घालावा लागला. अधिकारी पुढे सांगतात, या महिलेच्या घराचं वातावरण फार भयानक होतं. तिच्या घराच्या चारही बाजूंनी प्राण्याचं मल-मूत्र पसरलेलं होतं.

Shocking News
Viral Video: गजब! कुत्र्या मांजरांनाही चढला फिटनेस फिवर, चक्क माणसांरखाच गाळताय घाम

ही भयावह स्थिती बघून महिलेला अटक करण्यात आली. तिच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार या महिलेचं प्राण्यांवर फार प्रेम आहे. याच कारणाने तिचे मित्र तिला प्रेमाने स्नो व्हाइट म्हणायचे. पुढे ते म्हणतात, जेव्हाही या महिलेस रस्त्यावर बेघर प्राणी दिसला की ती त्याला तिच्या घरी घेऊन यायची. तिचे सगळे पैसे देखील तिने प्राण्यांसाठीचं खास घर बनवण्यात खर्च केलेय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com