Zombie gene
Zombie geneesakal

Zombie gene काय प्रकार आहे? मृत्यूनंतर शरीराचा 'हा' भाग होतो ॲक्टिव्ह...वाचा काय म्हणतात शास्त्रज्ञ

संशोधकांनी लावलेल्या नव्या शोधानुसार मानवी मेंदूमध्ये असा एक जीन सापडला आहे. जो मृत्यूनंतरही अॅक्टिव्ह असतो

Rare Truth: एकदा शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा संपला आणि हृदयाचे ठोके बंद पडले की मानवी जीव गेलाच समजा. अवघ्या काही मिनिटांत तुमचे अवयव काम करणं बंद करतात. याला 'पॉइंट ऑफ नो रिटर्न' असं म्हणतात. मानवी मृत्यूनंतर जेथे शरीराचे एक एक अंग हळू हळू ठप्प पडायला सुरूवात होते. तेथे संशोधकांनी लावलेल्या नव्या शोधानुसार मानवी मेंदूमध्ये असा एक जीन सापडला आहे. जो मृत्यूनंतरही अॅक्टिव्ह असतो. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

यूनिवर्सिटी ऑफ इलिनॉयसच्या संशोधकांनी न्यूरोलॉजिकल कंडीशनने ग्रस्त असलेल्या एका रूग्णाच्या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या ब्रेन टिश्यूंना वेगळ काढून त्यांच्यावर अभ्यास केला. यामध्ये त्यांनी पाहिलं की, बाकी पेशी मरून गेल्या होत्या, मात्र एक पेशी जिवंत होती.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही पेशी फार जलद गतीने वाढत असल्याचं समोर आलं. ही गोष्ट समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी दुसऱ्यांदा स्टिम्युलेटेड ब्रेन एक्सपेरिमेंट केलं. ज्यामध्ये मेंदूच्या पेशींना खोलीच्या सामान्य तापमानावर ठेऊन 24 तास त्यांच्यावर लक्ष ठेवलं.

मृत्यूनंतर शरीर लगेच मरत नसल्याचे पुढे आले

तुम्हाला माहिती आहे का की, मृत्यूनंतर शरीरातील अनेक अवयव काम करत असतात. यामध्ये यकृत, किडनी आणि हृदय यांचा समावेश आहे. अवयव दानाच्यावेळी लक्ष दिलं जातं की, डोनरच्या मृत्यूनंतर अर्ध्या तासापासून ते 6 तासांपर्यंत अवयव डोनेट होऊन प्रत्यारोपित केले जातात.

Zombie gene
Rare Disease: माणूस नव्हे का? प्राण्यासारखी वागणूक देतात अन् दिसताच दगडफेक; जगात केवळ 50 लोकांना हा आजार

मृत्यूनंतर शरीरात अनेक एक्टिव्हीटी देखील होत असतात. जसं की, केस आणि नखांची वाढ. इतकंच नव्हे तर पोटात असणारे गुड बॅक्टेरिया हे अन्न पचवण्याचं काम करत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com