
Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या व्हिडिओत एक लहान बाळ वॉकरवरून पायऱ्यांवरून खाली कोसळताना दिसत आहे. ही घटना एका रेसिडेन्शियल अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर bhavvc या युजरने शेअर केला असून, तो लाखो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओने बाळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.