

Motorola G-series smartphone blast company explaination
esakal
Motorola Blast Video Company Explaination : सोशल मीडियावर एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता, ज्यामुळे स्मार्टफोनच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले होते. मंगळवारी ३० डिसेंबरला शेअर झालेल्या या व्हिडिओतून असा दावा करण्यात आला होता की एका व्यक्तीच्या पँटच्या खिशात ठेवलेला मोटोरोला G सिरीजचा फोन अचानक जळाला आणि स्फोट झाला. परिणामी त्याच्या जीन्समध्ये मांडीजवळ मोठे जळलेले भोक पडले. सुदैवाने या घटनेत व्यक्तीला गंभीर इजा झाली नाही