
थोडक्यात
१. पुण्यातील पीएमटी बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने बस रस्त्यावर अनियंत्रित झाली.
२. चालक आणि कंडक्टरने त्वरित उपाययोजना करत मोठा अपघात टाळला.
३. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे बस सुरक्षिततेवर चर्चा सुरू झाली.
Viral Video: पुणे तिथे काय उणे..! हे तुम्ही अनेकवेळा ऐकले असेलच. या शहरातील अनेक गमती-जमती, पुणेरी पाट्या, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या पुण्याच्या पीएमटी बसचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या सांगितले आहे की बसचा ब्रेक फेल झाला आणि त्यानंतर ड्रायव्हरने कशा पद्धतीने उपघात टाळला आहे. अनेक नेटकऱ्यांनी संताप तर काहींनी कौतुक केले आहे.