
Train track reel stunt by minor sparks concern: सोशल मीडियावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात तरुण मुले सोशल मीडियावर काही लाईक्स आणि शेअरसाठी आपला जीव धोक्यात घालत असल्याचे दिसून येते. ही घटना ओडिशाच्या बौद्ध जिल्ह्यात उघडकीस आली. जिथे एक १२ वर्षांचा अल्पवयीन मुलगा रेल्वे रुळांवर झोपून आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहे आणि त्याच्यावरून ट्रेन गेली. दुसऱ्या एका तरुणाने ही घटना रेकॉर्ड केली आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेत सहभागी असलेल्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याचे माहिती आहे.