
Vishal Mega Mart Guard Salary Memes: सोशल मीडियावर दररोज काही ना काही ट्रेंड सुरु असतो. आता नवा आणि मजेशीर ट्रेंड सध्या सुरु आहे. मॉलमध्ये गार्ड अर्थात सुरक्षा रक्षकाच्या नोकरीसाठी इंटरनेटवर मजेशीर मीम्स आणि रील्सचा पूर आला आहे. जर तुम्ही इन्स्टाग्राम उघडलंत तर सर्वात आधी तुम्हाला विशाल मेगा मार्टमध्ये नोकरीचा मीमच पाहायला मिळेल.
खरंतर या मॉलमध्ये गार्डचा पगार हा दीड लाख रुपये महिना असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं ही एक अशी नोकरी आहे जी विशेषतः एखाद्या खासगी क्षेत्रात अनेक वर्षे मेहनत केल्यानंतर मिळते.