
दिल्लीतील एका तरुण सॉफ्टवेअर डेव्हलपरने आपल्या करिअरच्या पहिल्याच वर्षात पगारात तब्बल ५.५ लाखांवरून ४५ लाखांपर्यंत झेप घेतली आहे. या यशोगाथेने सोशल मीडियावर खळबळ उडवली असून, अनेकांना प्रेरणा मिळत आहे, तर काही जणांना यावर विश्वासच बसत नाहीये. या तरुणाचे नाव आहे देवेश, आणि त्याने आपल्या या यशाची कहाणी X वर शेऊर केली, ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.