जेव्हापासून इंटरनेटने आपल्या जीवनात प्रवेश केला आहे, तेव्हापासून रील बनवणे, सेल्फी घेणे आणि व्लॉग बनवणे सामान्य झाले आहे. स्वतःला व्हायरल करण्याच्या वेडात लोक काहीही करतात. त्यासाठी दुसऱ्याचा जीव किंवा स्वतःचा जीव पणाला लावतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. एक महिला ट्रेनला लटकत आहे आणि रील बनवत आहे, पण अचानक ती झाडाला धडकली आणि ट्रेनमधून पडली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.