

Surat hotel death case
esakal
Surat Hotel Death: गुजरातच्या सुरतमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युवक आपल्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये गेला. पण रिसेप्शनवर 'चेक-इन'ची प्रक्रिया सुरू असतानाच त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि तो काउंटरजवळच खाली कोसळला. त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्राथमिक तपासात हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचे संभाव्य कारण असल्याचे दिसून येत असले, तरी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.