Surat Police Viral Video : पोलीस कर्मचारी ठरला देवदूत ! जीव धोक्यात घालून सातव्या मजल्यावर चढला अन् तरुणाचे वाचवले प्राण, व्हिडिओ व्हायरल

Surat Police Rescue : तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तो बेशुद्ध अवस्थेत होता आणि उपचार सुरू आहेत. या धाडसी कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी पोलिसांचे कौतुक केले.
Surat Police constable Shailesh Chudasama brave

Surat Police constable Shailesh Chudasama brave

esakal

Updated on

गुजरातच्या सुरतमधील लस्काना भागातील एका इमारतीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आतून दरवाजा बंद करून विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला सुरत पोलिसांच्या पथकाने धाडसी कारवाई करत जीवदान दिले. या घटनेतील पोलीस कॉन्स्टेबल शैलेश चुडासमा यांच्या अतुलनीय धैर्य आणि तत्परतेमुळे तरुणाचे प्राण वाचले असून, या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या धाडसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com