
Inspiring Cancer Fighter Trisha Viral Video Uplifts Hearts Tadpaoge Tadpa Lo song
esakal
Trending Video Cancer Patient : कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंजणारी त्रिशा नावाची मुलगी आज लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान बनली आहे. तिने तिच्या धाडसाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने सर्वांचे मन जिंकले आहे. अलीकडेच तिचा 'तडपाओगे तडपा लो' या १९५९ च्या 'बरखा' चित्रपटातील गाण्यावरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्रिशा तिच्या डॉक्टरांसोबत आनंदाने नाचताना आणि गाताना दिसते. तिच्या चेहऱ्यावरील हास्य आणि उत्साह पाहून प्रत्येकजण थक्क झाला आहे.