
Debt Crime: पैशांसाठी कोण काय करेल याचा नेम राहिला नाही. तैवानमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कर्ज फेडण्याआधीच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कर्ज देणाऱ्या महिलेने मृतदेहासोबत महिलेने घृणास्पद कृत्य केलं आहे. हा प्रकार वाऱ्यासारखा पसरला आणि महिलेवर चोहीकडून टीकेची झोड उठली.
ली आणि पेंग यांच्यात पैशांवरुन वाद होता. लीने जेव्हा पेंगच्या मृत्यूबद्दल ऐकलं तेव्हा ती अंत्यसंस्काराच्या निमित्ताने त्याच्या घरी पोहोचली. सोबत एक खोटा दस्तावेज नेला. २८ हजार डॉलर म्हणजे २.४ कोटी रुपयांचं एक बनावट गृहकर्ज डॉक्युमेंट आणि प्रॉमिसरी नोटीस सोबत नेली.