Talking Crow : 'काका आले का ?' बोलणारा कावळा झाला व्हायरल, वाड्यातील गारगाव येथे नागरिकांनी केली गर्दी
Pet Crow : वाडा तालुक्यातील गारगाव येथील सरगम मुकणे या मुलाने पाळलेल्या कावळ्याने "काका बाबा" असे शब्द स्पष्टपणे बोलले. यामुळे कावळ्याच्या बोलण्याने गावकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
वाडा : तालुक्यातील गारगाव या गावी सरगम मुकणे या चौथीत शिकणा-या मुलाने एक कावळा पाळला असून तो कावळा काका बाबा आई ताई असे शब्द स्पष्ट बोलत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.हे आश्चर्य पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत.