
Summary
तेलंगणातील महिलेने बेकरीतून विकत घेतलेल्या करी पफमध्ये साप आढळल्याने खळबळ.
बेकरी मालकाने गंभीर घटनेवर हलक्यात प्रतिक्रिया दिल्याने महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून अन्नसुरक्षेच्या दृष्टीने तपास सुरू केला.
तेलंगणात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. श्रीशैला नावाच्या एका महिलेने स्थानिक अय्यंगार बेकरीमधून एग्ज पफ आणि करी पफ विकत घेतले होते. पण जेव्हा ती तिच्या मुलांसह घरी बसली आणि करी पफ खाऊ लागली तेव्हा त्यात साप पाहून तिला धक्काच बसला.