
सध्या अवकाळी पावसाचं सावट फक्त महाराष्ट्रावरच नाही तर उत्तर भारतातही पाहायला मिळतंय. हा अवकाळी पाऊस नुसता बरसत नाही तर वादळी वाऱ्यांसह बरसतो. या वादळी वाऱ्यांचा एक थरारक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये एका उंच रहिवासी बिल्डिंगमधील एका फ्लॅटच्या अक्षरशः खिडक्या अन् दरवाजे बेडरुममध्ये उखडून पडले आहेत. हे दृश्य इतकं भीषण आहे की यामुळं इमारतीच्या बांधकामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.