
अमेरिकेतील टेक्सासमधील एका भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. रस्त्यावर बर्फ साचल्यामुळे सकाळी वाहनांच्या गर्दीमुळे हा भयानक अपघात झाला होता असे सांगितले जात आहे. फोर्ट वर्थमधील I-35W वर सुमारे १३० वाहने एकमेकांवर आदळली, ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आणि ६५ हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. या धोकादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.