
Viral Video : तृतीयपंथीयांकडून तरूणाला चप्पल, लाथेने बेदम मारहाण; पोलीस स्टेशनपासून जवळच घडला प्रकार
मुंबई : मुंबई येथे दोन तृतीयपंथीयांकडून एका तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. तर इतर वाहनांना अडवून देखील त्यांच्याकडून सामान काढून घेण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तर ही घटना माहिम पोलीस स्टेशनपासून फक्त 200 मीटर अंतरावर घडली असल्याचा दावा करण्यात आला असून या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आला आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये दोन तृतीयपंथी एका तरूणाला लाथाने आणि चप्पलेने बेदम मारहाण करताना दिसत आहेत. टी-जंक्शन (माहीम) पोलीस स्टेशनपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पुष्टी सकाळ माध्यमांकडून केली जात नाही. हा व्हिडिओ मुंबई येथील माहिम परिसरात घडल्याचा दावा केला आहे. तर हा प्रकार घडत असताना अनेक बघ्यांची या ठिकाणी गर्दी झाली असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.