Statue of Khatu Shyam Found

Khatu Shyam

Sakal

Khatu Shyam: झाडाखाली दडलीय खाटू श्यामची मूर्ती, अमरपालला पडायचे रोज स्वप्न, उत्खनन केलं अन्... नेमकं काय घडलं?

The Statue of Khatu Shyam Found During Excavation in Unnao: उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे उत्खननादरम्यान खाटू श्यामची मूर्ती सापडली. अमर पाल नावाच्या एका तरुणाने हा दावा केला आहे जे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.
Published on

The Statue of Khatu Shyam: उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमर पाल नावाच्या एका तरुणाचा दावा आहे की गेल्या २५ दिवसांपासून त्याला एका झाडाखाली लपलेल्या खाटू श्यामच्या मूर्तीचे स्वप्न पडत होते. स्वप्नात त्याला जमिनीतून मूर्ती खोदून ते पुन्हा स्थापित करण्यास सांगितले गेले. सुरुवातीला त्याने या स्वप्नांकडे दुर्लक्ष केले, परंतु जेव्हा ते पुढे चालू राहिले तेव्हा त्याने स्वप्नात दिसणारे झाड खोदण्याचा निर्णय घेतला. खूप खोदकाम केल्यानंतर त्याला ती मूर्ती सापडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com