
Thums Up Panipuri : 'थम्स अप पाणीपुरी' चा व्हिडिओ व्हायरल; नेटिझन्सकडून मात्र...
Thums Up Panipuri : स्ट्रीट फूड प्रेमींची भारतात काही कमी नाही आणि त्यात पाणीपुरी खवय्यांची तर नाहीच नाही.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
तुम्ही अनेकदा रत्याच्या कडेला किंवा भेळेच्या गाडीवर मोठं तोंड करून पाणीपुरीचा आनंद घेताना अनेकांना पाहिलं असेल किंवा तुम्हीदेखील असाच आनंद घेत असाल.
भारतात पाणीपुरी, पुचका, गोलगप्पा अशा एक न अनेक नावांनी ओळखले जाते. गावांनुसार आणि राज्यांनुसार यातील पाण्याच्या चवीतही फरक आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर पाणीपुरीचं एक नव व्हर्जन पाहण्यास मिळत आहे.
सध्या सोशल मीडियावर थम्स अप पाणीपुरीचा व्हिडियो व्हायरल होत असून, एका ट्विटर यूजरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने “पाणीपुरी प्रेमी, येथे सादर करत आहे थम्प्स अप पाणीपुरी… थम्ब्स डाउनसह तुमचे प्रेम दाखवा,” असे कॅप्शन हा व्हिडिओ पोस्ट करताना या यूजरने लिहिले आहे.
व्हिडिओमध्ये नेमकं काय?
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पाणीपुरी विकाताना दिसत आहे. मात्र, पाणीपुरीची चव वाढावी यासाठी ही व्यक्ती पाण्याऐवजी थम्सअप एका भांड्यात टाकताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर, याची चव वाढण्यासाठी यात अनेक प्रकारचे मसालेदेखील टाकले जात आहेत.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, अनेक नेटिझन्स आणि पाणीपुरी प्रेमींना पाणीपुरीचं हे फ्युजन अजिबात आवडले नसल्याचा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.