
Traffic Police Video : 'लिंबाच्या झाडावर यमदेव बसलाय'; ट्राफिक पोलिसांनी मुलींना...
वाहतुकीचे नियम न पाळल्यास आपल्याला कारवाईला सामोरं जावं लागतं. एवढंच नाही तर दंडही भरावा लागतो. अशा वेळी आपण काहीतरी सुटण्याचा मार्ग काढतो. पण अनेक ट्राफिक पोलीस आपल्याकडून दंड वसूल करण्यापेक्षा समज देत असतात. अशाच एका पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा राजस्थान येथील आहे. पोलीस अधिकाऱ्याने गाडीवर जात असलेल्या दोन मुलींना थांबवलं आहे. हेल्मेट का नाही घातलं अशी विचारणा पोलिसांकडून केली असता मुली काहीच बोलत नाहीत. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांना समज देण्यात येत आहे.
हेही वाचा - योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त
दरम्यान, मुलींनी हेल्मेट घातलं नाही म्हणून पोलिसांनी त्यांना यमदेवाचं उदाहरण दिलं आहे. "या लिंबाच्या झाडावर यमदेव बसला असल्यास काय करायचं मग? तुमचे आईवडील घरी आपली मुलगी सुरक्षित आहे असा विचार करतात पण हेल्मेट नसल्यावर अडचण येऊ शकते" असं पोलिस अधिकारी मुलींना समजावत आहे.
पी के मस्त असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून ते जयपूर पोलिसांत कार्यरत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.