Train Emergency Chain Failed
esakal
धावत्या रेल्वेत दरवाजाजवळ उभं राहणं किंवा गाडीचा वेग कमी झाला की उतरायचा प्रयत्न करणं अतिशय धोकादायक ठरू शकतं—अनेकदा ते जीवावरही बेतू शकतं. अशा परिस्थितीत जर एखादा प्रवासी चुकून खाली पडला, तर ‘चेन पुलिंग’ हा एकमेव उपाय मानला जातो. मात्र, ट्रेनमधील आपत्कालीन साखळीच काम करत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही, तर रेल्वेच्या आपत्कालीन क्रमांकावरूनही मदत मिळत नसल्याचं उघड झालं आहे. यासंबंधीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.