
A customer shows excitement after buying the iPhone 17 Cosmic Orange, a trending color that sparked viral news across India.
Esakal
आजपासून भारतभरात आयफोन 17 मालिकेची विक्री सुरू झाली असून, दिल्ली, मुंबई, पुणे आणि बेंगळुरू येथील अॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अॅपलच्या चाहत्यांमध्ये नवीन आयफोन 17 ची प्रचंड उत्सुकता आहे. काही जण आपले जुने आयफोन बदलून नवीन मालिका खरेदी करत आहेत, तर काहीजण प्रथमच अॅपलच्या 'एलिट कम्युनिटी'मध्ये प्रवेश करत आहेत. यंदा आयफोन 17 च्या 'कॉस्मिक ऑरेंज' रंगाने विशेष लक्ष वेधले आहे. दिल्लीतील साकेत येथील अॅपल स्टोअरमधील एका खरेदीदाराचा व्हायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.