

farmer fights with tiger with a stick in kanha national park
esakal
मध्य प्रदेशातील कान्हा टायगर रिझर्व्हला लागून असलेल्या करेली गावात वाघाच्या हल्ल्यातून एका ३० वर्षीय आदिवासी तरुणाने धैर्याने स्वतःचा बचाव केल्याची थरारक घटना समोर आली आहे. शेताकडे जात असताना अचानक समोर आलेल्या वाघाने तरुणावर हल्ला केला. मात्र, घाबरून न जाता संतोष मेश्राम याने हातातील काठीच्या मदतीने तब्बल १५ मिनिटे वाघाचा सामना केला. अखेर ग्रामस्थ मदतीसाठी धावून आल्यानंतर वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.