
Video: ढिगाऱ्याखालून दोन वर्षांच्या बाळाला वाचवलं! बचावकर्त्याचा भावनिक व्हिडिओ व्हायरल
तुर्कस्तान आणि सिरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपामध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. यासाठी मोठी बचाव मोहिम राबवण्यात येत आहे. अशाच एका बचाव मोहिमेदरम्यान कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एका दोन वर्षाच्या बाळाला वाचवण्यात आलं. यावेळी बचावकर्त्यानं या बाळाला आपल्या कुशीत घेतलं तेव्हा तो भावूक झालेला पहायला मिळाला. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. (Turkey earthquake two year old was saved from debris Rescuer emotional video viral)
या व्हिडिओत एका कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली कोणी अडकलं आहे का याचा शोध बचाव पथक घेताना दिसत आहे. त्यात एक दोन वर्षाचं बाळ तिथं अडकून पडल्याचं दिसून आलं, त्यानंतर बचाव पथकाची चक्र वेगाने फिरली. त्यांना आवश्यक सुरक्षा उपकरणांसह या बाळाच्या मदतीसाठी प्रयत्न सुरु केले. अनेक प्रयत्नानंतर या बाळाला या ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं.
या बाळाला दोन्ही हातात घेतल्यानंतर बचावकर्ती व्यक्ती भावूक झाली होती. या व्यक्तीनं बाळाच्या कपाळावर प्रेमानं चुंबन घेतलं. हा व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर तुफान व्हायरलं झाला. बचावकर्त्याव्यक्तीच्या या कृतीनं माणसातील ममत्व अजून टिकून असल्याचं प्रतित होतं. तुम्हीही हा व्हिडिओ पाहिल्यास भावनिक व्हाल.
दरम्यान, तुर्कीमध्ये सोमवारी (६ फेब्रुवारी) पहाटे झालेल्या भीषण भूकंपामध्ये मोठी वित्त तसेच जीवितहानी झाली आहे. यामध्ये अनेक उंच इमारती पत्त्यांप्रमाणं कोसळल्या तर ताज्या आकडेवारीनुसार, यामध्ये सुमारे २०,००० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकांना वाचवण्यात यश आलं आहे. अजूनही इथं बचाव कार्य सुरु असून जगभरातून तुर्कीसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. भारतानंही औषध, कपड्यांसह बचाव कार्यासाठी प्रशिक्षिक श्वानही तुर्कीला पाठवले आहेत.