
Farmer Women Dance : 'मन रानात गेलं गं'; शेतकरी महिलांचा शेतात भन्नाट डान्स, Video
शहरात काम करून करून कंटाळा आल्यावर अनेकजण ग्रामीण भागात आरामासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात काही दिवस घालवण्यासाठी जात असतात. ग्रामीण भागातील वातावरण प्रसन्न करत असतं. सध्या शेतकरी महिलांच्या डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधील महिला या कलाकार असल्याचं सांगण्यात येत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन महिला साडी नेसून शेतात भन्नाट डान्स करत आहेत. मन रानात गेलं गं, पानापानांत गेलं गं' या गाण्यावर त्या डान्स करत असून त्यांच्या डान्सच्या स्टेप पाहून त्या पट्टीच्या डान्सर असल्याचा भास होईल. त्यांच्या मागून एक उसतोडीची मोकळी बैलगाडी जाताना दिसत आहे.
गाडीतील काही व्यक्तींना पाहून या महिला लाजत आहेत पण परत डान्स सुरू करत आहेत. त्यांचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.