Viral Video : 'ती' बुरखा घालून आली अन् थेट नवरदेवालाच मारली मिठी; सोडलंच नाही

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral VideoSakal

लग्न म्हणजे सर्वांच्या आनंदाचा दिवस असतो. जर मित्राचं लग्न असेल तर बाकीच्या मित्रांसाठी वेगळीच मेजवानी असते. पण लग्नसमारंभात व्यत्यय येऊ नये यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये एक बुरखाधारी व्यक्ती येऊन लग्नमंडपात उभा असलेल्या नवरदेवाला मिठी मारत आहे.

Viral Video
डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून एक बुरखाधारी व्यक्ती नवरदेवाला मिठी मारताना दिसत आहे. बराच वेळ ती व्यक्ती नवरदेवाला मिठी मारून उभी आहे. नवरदेवाला सोडत नसल्यामुळे नवरीही बावरून त्याच्याकडे पाहत आहे. पण नंतर कळतं की, बुरखा घातलेला नवरदेवाचा मित्र आहे आणि तो नवरदेवाला सरप्राईज देण्यासाठी आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com