
Latest Viral Video : बाजारातून भाजीपाला विकत घेताना आपल्याला आरोग्यदायी आणि ताज्या भाज्या मिळतील, असा आपला विश्वास असतो. मात्र, एका धक्कादायक व्हिडीओमुळे हा विश्वास पुन्हा डळमळीत झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेल्या कोबी दाखवण्यात आला आहे. यामुळे बाजारात सहजपणे नकली भाजीपाला विकला जातोय हे समोर आलेले आहे. ज्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
या व्हिडीओमध्ये एक महिला बाजारातून विकत आणलेला कोबी हा प्लास्टिकचा असल्याचा दावा करताना दिसते. तिने हा कोबी तपासण्यासाठी त्याची पाने जाळण्याचा आणि फाडण्याचा प्रयत्न केला, मात्र, पानं जळत नसल्याचं आणि प्लास्टिकप्रमाणे ताणली जात असल्याचं तिनं दाखवलं. हा प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. “लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिली आहे.
बाजारात आधीच भेसळयुक्त खाद्यपदार्थांमुळे ग्राहक फसवले जात आहेत. तेल, मसाले, दूध यांसारख्या मूलभूत वस्तूंमध्ये भेसळ ही नित्याचीच बाब बनली आहे. मात्र, आता थेट भाज्यांमध्येही भेसळ होत असल्याचं उघड झाल्यानं खवय्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
भाजीपाला आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, जर या भाज्या बनावट असतील, तर त्याचा शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे. बाजारातून भाजी विकत घेताना ती व्यवस्थित तपासणं आणि शक्य असल्यास शेतकऱ्यांकडून थेट भाजीपाला घेणं हा पर्याय स्वीकारणं अधिक सुरक्षित ठरेल.
1. बाजारातून कोबी किंवा इतर पालेभाज्या विकत घेताना त्यांचा पोत, रंग, आणि वास नीट तपासा.
2. प्लास्टिकसारखा चमकदार आणि गुळगुळीत पोत असलेल्या भाज्या शक्यतो घेऊ नका.
3. शक्य असल्यास स्थानिक शेतकऱ्यांकडून किंवा ओळखीच्या विक्रेत्यांकडूनच भाजीपाला खरेदी करा.
4. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा व्हिडीओंवर विश्वास ठेवण्यापूर्वी योग्य पडताळणी करा.
व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. “उद्या आपल्यालाही याचा फटका बसू शकतो,” असं म्हणत नागरिकांनी या प्रकारावर चिंता व्यक्त केली आहे. सरकारने यावर तात्काळ पावलं उचलावी आणि बनावट खाद्यपदार्थ तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
भेसळीच्या वाढत्या प्रकरणांमुळे नागरिकांपुढे मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. “आता सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न खायचं तरी काय?” तज्ञांच्या मते, फळं-भाज्या खरेदी करताना सावधगिरी बाळगणं आणि आरोग्यविषयक जागरूकता ठेवणं ही काळाची गरज आहे.
भाज्यांमध्ये सुरू असलेल्या या बनावटपणाच्या खेळामुळे एकंदरच ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता नागरिकांनी अधिक जागरूक राहून योग्य उपाययोजना करणं अत्यावश्यक ठरलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.