Viral Video: उत्तरप्रदेशच्या बरेलीमधील आंवलामध्ये एका मध्यपी युवकाने विकृतीचा कळस गाठला. त्याने सुरुवातीला पत्नीला वाईट पद्धतीने मारहाण केली. त्यानंतर छतावरून उलटा लटकवलं. एवढ्यावरच न थांबता त्याने चिरकून-चिरकून बेशुद्ध झालेल्या पत्नीला वरुनच खाली सोडून दिलं. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.