
उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील ऊर्जामंत्री एके शर्मा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सुल्तानपूर जिल्ह्यातील सूरापुर येथे बुधवारी घडलेल्या या घटनेत, स्थानिकांनी विजेच्या तीव्र समस्येबद्दल तक्रार केली. मात्र, मंत्र्यांनी त्यांच्या तक्रारींकडे लक्ष देण्याऐवजी 'जय श्रीराम' आणि 'जय हनुमान'चे नारे लावले आणि गाडीत बसून निघून गेले. या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.