

Farmer Turns Crorepati, Buys Helicopter
esakal
नवी दिल्ली: पश्चिम उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याच्या जीवनात मोठा बदल घडला आहे. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी त्याच्या जमिनीचे संपादन झाल्याने त्याला जवळपास १५ कोटी रुपयांची भरपाई मिळाली. या मोठ्या रकमेच्या बळावर त्याने हेलिकॉप्टर खरेदी केले असून, आता थायलंडच्या सहलीचे नियोजन सुरू केले आहे. ही घटना मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. या विमानतळाचे उद्घाटन २८ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.