Viral News : नवरदेवाने टोलनाक्यावर घेतले नवरीचे चुंबन, मॅनेजरने CCTV व्हिडिओ दाखवून केले ब्लॅकमेल; समोर आले भयानक सत्य

CCTV Misuse Case : पैसे घेतल्यानंतरही आरोपीने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची माहिती मिळाली.आसपासच्या गावातील महिलांचे शौचास जातानाचे तसेच मुलींच्या हालचालींचे व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केल्याचेही आरोप आहेत.
CCTV footage from a UP toll plaza allegedly misused to record private moments of commuters, leading to blackmail and viral video threats.

CCTV footage from a UP toll plaza allegedly misused to record private moments of commuters, leading to blackmail and viral video threats.

esakal

Updated on

उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल एक्सप्रेसवेवरील हलियापूर टोल प्लाझावरील एन्ट्री ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (एटीएमएस) मधील सीसीटीव्ही फुटेजचा गैरवापर करून अश्लील व्हिडिओ तयार केल्याचा आरोप करणारी लेखी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील टोल मॅनेजरवर तक्रारदाराने गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की सीसीटीव्ही फुटेजचा वापर करुन लोकांना त्यांच्या खाजगी कामांचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्यासाठी केला जातो. या तक्रारीनंतर, सोशल मीडियावर असे अनेक प्रकरण व्हायरल होत आहेत. टोल प्लाझा मॅनेजरने एका नवविवाहित जोडप्याच्या खासगी क्षणांचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन व्हायरल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com