

Shubham Shukla secured All India Rank 116 in UPSC Civil Services Examination 2024 and achieved his dream of becoming an IPS officer despite facing personal tragedies and repeated setbacks
esakal
मध्य प्रदेशातील रीवा येथील शुभम शुक्ला यांचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशाचा प्रवास संघर्ष, अपयश आणि वैयक्तिक दुःखांनी भरलेला आहे. यूपीएससी परीक्षेची तयारी करताना त्यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. प्राथमिक परीक्षा दिल्याच दिवशी त्यांनी आजीला गमावले. त्यानंतर आजोबांचेही निधन झाले. एवढेच नव्हे, तर मुलाखतीच्या अगदी आधी ज्या जिवलग मित्रासोबत त्यांनी नागरी सेवेत जाण्याचे स्वप्न पाहिले होते, त्याचाही कार अपघातात मृत्यू झाला. मात्र, या घटनांनी खचून न जाता त्यांनी दुःखालाच आपली ताकद बनवले आणि यूपीएससी २०२४ मध्ये देशात ११६ वा क्रमांक मिळवत भारतीय पोलीस सेवेत स्थान मिळवले.