Trending News: ज्याने नोकरी दिली, त्याचेच 170 कोटी लुटले! महिलेचा घरातील अजब कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

US Woman Steals ₹170 Crore from Employer: एका महिलेने 10 वर्षे आपल्या मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत तब्बल 180 कोटी रुपये लांपास केले. या प्रकरणाचा तपास करताना तिच्या आलिशान घरात जे काही आढळलं, ते पाहून तपास अधिकारीही थक्क झाले.
US Woman Steals ₹170 Crore from Employer Over 10 Years; Police Recover 1,500 Luxury Items from Her Home

US Woman Steals ₹170 Crore from Employer Over 10 Years; Police Recover 1,500 Luxury Items from Her Home

eSakal

Updated on: 

Lizbeth Sherman 170 crore fraud case explained: अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका महिलेने आपल्या मालकाची तब्बल 18 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 170 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे, ही फसवणूक एक-दोन वर्षे नव्हे, तर सलग 10 वर्षे सुरू होती. या पैशांचा वापर तिने महागड्या शॉपिंगपासून ते खासगी विमान प्रवास आणि आलिशान घरासाठी केला.

अमेरिकेत घडलेल्या या प्रकरणातील आरोपी महिलेचं नाव लिझबेथ शर्मन असून ती 47 वर्षांची आहे. ती कॅलिफोर्नियातील एल डोराडो हिल्समध्ये राहत असून तिने आपला गुन्हा कबूल केला आहे.

Loading content, please wait...