Viral News : घटस्फोटानंतरही विश्वासघात सहन झाला नाही, ७६ वर्षीय महिलेने पती अन् त्याच्या मैत्रिणीला गोळ्या झाडून केले ठार

गोळीबाराच्या आवाजावर आलेल्या पामेलाच्या आई डायन कुक (५५) वरही ग्रेसने गोळी झाडली, मात्र गोळी हाताला लागून ती बचावली. घटना मॅकनॅट फॉल्सजवळील पामेलाच्या घरी घडली; चार गोळ्या लागून दोघे जागीच मरण पावले.
Grace Edge Georgia Shooting: What Happened in Toombs County

Grace Edge Georgia Shooting: What Happened in Toombs County

esakal

Updated on: 

अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एका ७६ वर्षीय महिलेने तिच्या माजी पतीची आणि त्याच्या ४० वर्षीय मैत्रिणीची गोळ्या झाडून हत्या केली. या महिलेने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मैत्रिणीच्या आईवरही गोळी झाडली, मात्र, गोळी तिच्या हाताला लागल्याने ती बचावली. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, मृतांची ओळख ७५ वर्षीय वॉल्स ट्रुमन एज आणि ४० वर्षीय पामेला कुक अशी पटली आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link:

https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com