

uttarakhand river stunt by youth viral video
esakal
पावसाळ्यात नद्या, ओढे आणि धबधब्यांजवळ जाताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन उत्तराखंड पोलिसांनी केले आहे. पोलिसांनी आपल्या अधिकृत 'X' हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नदीत तीन तरुण धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये नदीचा प्रवाह मोठ्या वेगाने वाहताना दिसतो. या खवळलेल्या नदीच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या खडकावर तीन तरुण उभे असल्याचे दिसते. काही क्षणांनी हे तिघेही थेट नदीच्या प्रवाहात उड्या मारतात. पाण्याचा वेग आणि नदीची परिस्थिती पाहता त्यांची ही कृती अत्यंत धोकादायक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.