Viral Video : मिठाई विकत घेण्याआधी हा व्हिडिओ पाहा ! आवडीने कचोरी विकत घेतली, घरी जाऊन पॅकेट उघडून पाहिले तर... धक्कादायक प्रकाराने खळबळ

Rat Droppings in Kachori : धक्कादायक म्हणजे, मुलांनी त्यापैकी दोन कचोऱ्या खाल्ल्याने त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. ग्राहकाने कचोऱ्या दुकानात दाखवल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी पार्सल फेकून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Rat Droppings Allegedly Found in Kachoris in Vaijapur

Rat Droppings Allegedly Found in Kachoris in Vaijapur

esakal

Updated on

Rat Droppings Allegedly Found in Kachoris in Vaijapur : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातून खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मिठाईच्या दुकानातून खरेदी केलेल्या कचोऱ्यांमध्ये चक्क उंदराच्या लेंड्या आढळून आल्याचा आरोप ग्राहकाने केला आहे. विशेष म्हणजे, ग्राहकाने खरेदी केलेल्या पाचही कचोऱ्यांमध्ये हा प्रकार आढळल्याने परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित दुकानाविरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com