Railway Toilet Incident Video : "गेट तोडा नाहीतर मी मरेन..." ; माजी मुख्यमंत्र्यांचे मीडिया सल्लागार अडकले रेल्वेच्या शौचालयात!

Former CM's media advisor gets stuck in railway toilet : जवळजवळ एक तास अडकून राहिले आणि गुदमरत होते ; जाणून घ्या, व्हिडिओ अन् फेसबुकपोस्टमध्ये काय म्हटलंय?
Railway Toilet Incident Video : "गेट तोडा नाहीतर मी मरेन..." ; माजी मुख्यमंत्र्यांचे मीडिया सल्लागार अडकले रेल्वेच्या शौचालयात!

esakal

Updated on

Vasundhara Raje Media Advisor Mahendra Bhardwaj Incident : राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे मीडिया सल्लागार शुक्रवारी रेल्वेच्या शौचालयात अडकले होते. अखेर त्यांनी जीवाच्या आकांताने ओरडून सांगितले की, "गेट तोडा नाहीतर मी मरेन." जवळजवळ एक तास ते दुर्गंधीयुक्त वातावरणात अडकून, गुदमरत होते. अखेर त्यांना मोठ्या प्रयत्नानंतर वाचवण्यात आले. ही घटना कोटा-श्रीगंगानगर एक्सप्रेस ट्रेनमध्ये घडली. 

शुक्रवारी संध्याकाळी महेंद्र भारद्वाज २२९८१ क्रमांकाच्या ट्रेनने कोटाहून जयपूरला परतत होते.  दरम्यान,  सवाई माधोपूरजवळील ट्रेनच्या शौचालयात ते अडकले. ते जवळजवळ एक तास आत अडकले, जवळजवळ गुदमरत होते. महेंद्र भारद्वाज यांनी त्यांची दुर्दशा सोशल मीडियावर शेअर केली.

महेंद्र भारद्वाज शौचालयात गेले होते, परंतु जेव्हा त्यांनी बाहेर पडण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते अडकले. कारण, दरवाज्याची कुंडीच निघत नव्हती,  ज्यामुळे ते प्रचंड अस्वस्थ झाले होते. त्यांच्याकडे कोणत्याही रेल्वे अधिकाऱ्याचा फोन नंबरही नव्हता. अखेर त्यांनी मोठ्याने आवाज दिले, पण त्यांचा आवाजही कुणाला येत नव्हता. त्यानंतर त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन लावून परिस्थिती सांगितली. दरम्यान, मर्यादित जागा आणि दुर्गंधीमुळे त्यांचा जीव देखील गुदमरत होता.

Railway Toilet Incident Video : "गेट तोडा नाहीतर मी मरेन..." ; माजी मुख्यमंत्र्यांचे मीडिया सल्लागार अडकले रेल्वेच्या शौचालयात!
Raj Thackeray Tweet on NCP President Post : ‘’राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण..’’ ; राज ठाकरेंच्या ट्वीटने खळबळ

यानंतर जेव्हा महेंद्र भारद्वाज यांच्या नातेवाईकांनी रेल्वे अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. तेव्हा त्यांनी रेल्वेच्या डब्यात कर्मचारी पाठवले. मात्र, ते देखील त्वरित मदत करू शकले नाहीत. अखेर,  त्यांना दरवाजा तोडावा लागला, परंतु यावेळी दरवाजा महेंद्र भारद्वाज यांच्यावर पडण्याचाही धोका होता. अखेर त्यांच्या विनंतीनुसार, कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून त्यांना कसेबसे बाहेर काढले आणि भारद्वाज यांनी सुटकेचा निश्वास सोडत, मोकळा श्वास घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com