
Rajkot Rain Update : गुजरातमधील शहर असलेल्या राजकोटमध्ये सध्या तुफान पाऊस बरसत असून शहरातील मुख्य रस्त्यांवरुन वेगानं पाणी वाहत आहे. याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडिायावर लोकांनी शेअर केले आहेत. पावसानं इथं इतकं रौद्ररुप धारण केलं आहे की यामध्ये रस्त्यावरील गाड्या मालकांच्या डोळ्यादेखत वाहून जाताना दिसत आहेत. या घटनेचा थरारक व्हिडिओ एकदा पाहाच.