Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

Hot Sambar Accident : तोल गेल्याने सुजाता थेट गरम सांबारच्या भांड्यात पडल्या आणि गंभीररित्या भाजल्या. घटनास्थळी उपस्थितांनी त्यांना तातडीने बाहेर काढून विजयवाडा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
Tragic Accident Vijayawada

Tragic Accident Vijayawada

esakal

Updated on

Tragic Accident Vijayawada : आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे विनायक चतुर्थीनिमित्त आयोजित अन्नदान कार्यक्रमादरम्यान घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. सुजाता असे मृत महिलेचे नाव आहे. तयार सांबारचे मोठे आणि गरम भांडे खाली उतरवताना सुजाताचा तोल गेला आणि ती थेट भांड्यात पडली. या अपघातात ती गंभीर भाजली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com