Cricket Funny Video : "अरे फिल्डिंग करताय की म्हशीला दगडं मारताय" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cricket Viral Video

Cricket Funny Video : "अरे फिल्डिंग करताय की म्हशीला दगडं मारताय"

क्रिकेट हा अनेकांच्या आवडीचा खेळ असतो. क्रिकेटचे अनेक विनोदी व्हिडिओ आपण पाहिले असतील. सध्या अशाच एका सामन्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये फलंदाजाने कोणताही फटका न मारता प्रतिस्पर्धी संघाच्या वाईट क्षेत्ररक्षणामुळे पळत चार धावा काढल्या आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा गावातील एखाद्या क्रिकेट टुर्नामेंटचा आहे. या सामन्यामध्ये बॉलरने बॉल टाकल्यानंतर फलंदाजाकडून चेंडू पाठीमागे जातो. पाठीमागे किपर हा बॉल अडवायचा प्रयत्न करतो तोपर्यंत एक फलंदाज एक धाव पूर्ण करतात. तर नंतरही चुकीच्या आणि बेसुमार क्षेत्ररक्षणामुळे चार धावा पळून पूर्ण करतात.

यावेळी क्षेत्ररक्षकांमध्ये कोणताही ताळमेळ असल्याचं या व्हिडिओत दिसत नाही. फलंदाजाला कसं आऊट करावं यासंदर्भात त्यांच्यामध्ये संवाद नसल्यामुळे फुकटच्या चार धावा समोरच्या संघाला मिळाल्या. हा विनोदी व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून "अरे फिल्डिंग करताय की म्हशीला दगडं मारताय" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.