
क्रिकेट खेळताना रोनाल्डो घुसला अंगात; तरूणाचा बॉन्ड्रीवर अफलातून कॅच, Video होतोय Viral
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एका क्रिकेट सामन्यातील कॅचचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तो सध्या चांगलाच चर्चेत आहे. क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासहित अनेक दिग्गजांनी हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे. या तरूणाचा झेल पाहून आपणही बघतंच रहाल.
हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
एका गावातील क्रिकेट लीगमधील हा व्हिडिओ आहे. फलंदाजाने चेंडू मारल्यानंतर एका फिल्डरने सीमेवर तो चेंडू उडी मारून पकडला पण त्याचा तोल गेला. तेवढ्यात त्याने चेंडू वर फेकला पण तो सीमारेषेबाहेर गेला होता. त्यानंतर त्याने उडी मारून पायाने चेंडू वर मारला आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला. तर क्रिकेट खेळताना या तरूणाच्या अंगात रोनाल्डो घुसला अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून या व्हिडिओला लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.