
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. शहरातील एका भटक्या कुत्र्याने एका म्हशीला चावा घेतला आणि त्याच म्हशीचे दूध पिणारे सुमारे 15 जण रेबीजचे इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णालयात गेले. इंजेक्शन घेण्यासाठी आलेल्या लोकांना रेबीजची लागण होण्याची भीती होती. अशा स्थितीत सर्वांनी जिल्हा रुग्णालयात पोहोचून रेबीजचे इंजेक्शन घेतले.