Couple Into Bulls Viral Video: प्रेमीयुगुलांना त्यांच्या प्रेमाची तालिबानी शिक्षा मिळाली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ओडिशाच्या रायगड जिल्ह्यातून मानवतेला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. कंजामाझिरा गावात एका प्रेमी जोडप्याला गावातील परंपरांविरुद्ध लग्न केल्यामुळे तालिबानी शिक्षा देण्यात आली. या अमानुष घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.